आज संसदेत आयोजित करण्यात आलेल्या
#गृहनिर्माण आणि
#नगरविकास खात्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून दिलेला निधी योग्य प्रकारे वापरला जातो का? विकासकामे वेळेवर आणि योग्य पद्धतीने पूर्ण होत आहेत का? याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचा आहे असे स्पष्ट मत मांडलं.
#ई_गव्हर्नन्स आणि संगणकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर शासनाकडून निधी दिला जातो, पण प्रत्यक्षात त्याचे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत का, यावर बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी सल्लागार कंपन्या सुंदर सादरीकरण करून निधी मंजूर करून घेतात, पण नंतर त्या योजना बंद होतात, यामुळे शासनाचा पैसा वाया जातो. या सगळ्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सल्लागार कंपन्यांच्या अहवालांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः या सर्व गोष्टीवर देखरेख ठेवली पाहिजे आणि झालेल्या विकासकामांचे वेळोवेळी ऑडिट केले पाहिजे. भ्रष्टाचार टाळण्यासाठी कठोर कारवाई केली पाहिजे.सल्लागार कंपन्या आणि अधिकाऱ्यांमधील साटेलोटे बंद करून प्रत्यक्ष कामाला प्राधान्य दिलं पाहिजे.
माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की, केंद्र सरकारच्या योजना फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात उतराव्यात. विकास कामांसाठी दिलेला प्रत्येक पैसा हा विकासासाठीच वापरला गेला पाहिजे. नागरिकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. ई-गव्हर्नन्स असो की अन्य कोणतीही योजना, ती ज्या उद्दिष्टासाठी तयार केली जाते, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. फक्त घोषणा करून नाही, तर काम करूनच आपण खऱ्या अर्थाने देशाचा विकास करू शकतो.
@Shivsenaofc
#nareshmhaske #ईगव्हर्नन्स #जनतेचाहक्क #EGovernance #NationProgress #CorruptionFreeIndia #Shivsena #thanekar