अनुदानाची रक्कम (सप्टेंबर-2025) अद्याप ज्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झालेली नाही, अशा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आवाहन! आपल्या अनुदानाची सद्यस्थिती तपासावी.
तसेच पेमेंट नामंजूर, शेतकरी ओळखपत्रानुसार नावात तफावत, पेमेंट यशस्वी आहे पण रक्कम जमा झाली नाही, ई-केवायसी प्रलंबित यांपैकी आपापल्या अनुदान स्थितीनुसार आवश्यक कार्यवाही करून घ्यावी.
बाधित शेतकऱ्यांपैकी जे सामाईक खातेदार असतील त्यांनी नेमलेल्या पालक अधिकारी यांच्याकडे संमतीपत्र जमा करावे, जेणेकरून वेळेवर अनुदानाचा लाभ संबंधितांस देता येईल.
वरीलपैकी आपापल्या अडचणींनुसार आवश्यक कार्यवाही करावी, त्यानंतरच आपल्या खात्यावर अनुदान प्राप्त होईल, याची नोंद घ्यावी. त्यामुळे वरील सुचनांचे गांभीर्याने पालन करुन, आपले अतिवृष्टी अनुदान रक्कम त्वरित प्राप्त करुन घ्यावे.
#FarmerSupport #ReliefUpdate #DirectBenefitTransfer #AgricultureWelfare