कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुक्त कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली. आगामी पावसाळा, नागरी सुविधा आणि महापालिकेचे उत्पन्न वाढवणे या त्रिसूत्रीवर भर देत आयुक्तांनी सर्व विभागांना थेट कृती करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
घरफाळा व पाणीपट्टी थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करणे, बोजा नोंदवणे आणि नळजोडणी खंडित करण्याची कडक मोहीम राबवली जाईल. कचरा उठाव व पाणीपुरवठा प्रभावी करणे, लाडपागे वारस नियुक्त्या तातडीने पूर्ण करणे आणि जयंती नाल्यातील गाळ २ दिवसांत काढण्याचे निर्देश. चारही विभागीय कार्यालयांना स्वतंत्र अतिक्रमण विरोधी वाहने दिली जातील. सहायक आयुक्तांनी प्रभाग स्तरावरच साप्ताहिक आढावा घेऊन प्रकरणांचा निपटारा करावा. 'वुलू' (Wulu) संस्थेमार्फत शहरात आणखी ४ अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून, जागा निश्चितीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार अमल महाडीक यांचे एलईडी दिवे बसवणे, ईएसएसएल कंपनीला ब्लॅकलिस्ट करणे, शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश-पाठ्यपुस्तके देणे आणि झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी ४ बूम यंत्रे भाड्याने घेण्याचे आदेश दिले आहेत.
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त जयंत जावडेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सुरेश पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, कामगार अधिकारी राम काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, सहायक विद्युत अभियंता नारायण पुजारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आणि कनिष्ठ अभियंता पदमल पाटील उपस्थित होते.
#KMCKolhapur #AdministrativeAction #CleanKolhapur #WaterSupply #RevenueCollection