जनता की यही पुकार, बंद करो महंगाई की मार..
दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रविकांत बावकर यांच्या नेतृत्वाखाली आज मोती टॉकीज चौक, कुंभारवाडा, मुंबई येथे पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या दरवाढी विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात आले. दरम्यान हे वाढवलेले दर सरकारने तात्काळ मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
या जनआंदोलनात नगरसेविका राजश्री भटकानकार, हिरा देवासी, अभिमन्यू नागरे, तारक शाह, जुनेद कुरेशी, संदीप खांडके, अदन पारेख, ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र चौरसिया, अमीन पारेख, असलम खान, राघोबा बाईट, कैलास जवेरी, अलका काश्मिरी राणे, महेश परमार, विनोद मेहता यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.