४९१ कोटींचा नियतव्यय मंजूर, अधिकारी बेफिकीर; पालकमंत्री, खासदारांनाही जुमानत असल्याने अंमलबजावणी धोक्यात;
राजेंद्र पातोडे यांचा घणाघात.
अकोला: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत ४९१ कोटी ७० लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला असला, तरी नियोजनाच्या मुख्य बैठकीलाच मोठ्या संख्येने अधिकारी गैरहजर राहिल्याने जिल्ह्याच्या विकासाचा बोजवारा उडाला आहे.हे गैरहजर अधिकारी पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा नियोजन समिती यांपैकी कुणालाही जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली असून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा अधिकाऱ्यांनी महाराजस्व अभियाना सारखा बोजवारा उडविला आहे.
नियोजन भवनात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे या ४९२ कोटींच्या नियतव्ययाची अंमलबजावणीच आता धोक्यात आली आहे.अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या विकासाशी काहीही सोयरसुतक राहिलेले नाही, असे पातोडे यांनी म्हटले आहे. त्यांना 'कारणे दाखवा' नोटिसींचा फारसा परिणाम नाही होत नसल्याने
बैठकीला अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा' (शो-कॉज) नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले असले, तरी यापूर्वीही अशा नोटिसींना अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.अधिकारी जिल्हा नियोजन समितीला गांभीर्याने घेत नसल्याने, या नोटिसींचा काहीही परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अवास्तव प्रस्ताव आणि गंभीर चुका करण्यात येतात मात्र त्यावरून कारवाई फक्त कागदावरच होते.बैठकीत कार्यालयांनी अवास्तव प्रस्ताव पाठवू नयेत आणि कामांमधील गंभीर चुका करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा सूचना जाहीरपणे द्याव्या लागल्या. यावरूनच सध्या प्रशासनात काय गोंधळ सुरू आहे याचा अंदाज येतो, असे पातोडे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, अकोला जिल्ह्यात यापूर्वी कामांमध्ये गंभीर चुका, भ्रष्ट्राचार झाल्याच्या अनेक तक्रारी झाल्या, प्रत्यक्ष जनप्रतिनिधी ह्यांनी तक्रार केल्या मात्र एकाही दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाल्याचे उदाहरण जिल्ह्यात दिसत नाही.रस्ते व इतर विकासकामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले गेले असले, तरी उपस्थित आणि गैरहजर अधिकारी ते किती गांभीर्याने घेतात यावर आता शंका उपस्थित केली जात आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
९४२२१६०१०१
#Akola #DistrictPlanningCommittee #RajendraPatode #VanchitBahujanAghadi #AkolaNews #MaharashtraPolitics #AdministrativeApathy #DevelopmentFunds
@CMOMaharashtra @VBAforIndia @PTI_News