📍 जीवदानी हेलीपॅड, विरार पूर्व, ता. वसई
🗓️ दिनांक : २० डिसेंबर २०२५
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
@mieknathshinde साहेब यांचे आज जीवदानी हेलीपॅड, विरार पूर्व येथे वसई विधानसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी या नात्याने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी माझ्या आमदारपदाच्या एक वर्षपूर्ती निमित्त केलेल्या विकासकामांचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री महोदयांकडे सादर केला.
वसई विधानसभा मतदारसंघात गेल्या एका वर्षात राबविण्यात आलेल्या विविध पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा तसेच जनतेच्या प्रश्नांवर घेतलेल्या ठोस निर्णयांची माहिती या अहवालातून देण्यात आली.
याप्रसंगी माझ्यासह महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रतापजी सरनाईक, शिवसेना नेते आमदार श्री. रविंद्रजी फाटक, नालासोपारा विधानसभेचे आमदार श्री. राजनजी नाईक, पालघर विधानसभेचे आमदार श्री. राजेंद्र गावित, बोईसर विधानसभेचे आमदार श्री. विलासजी तरे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. निलेश तेंडुलकर, शिवसेना वसई तालुका प्रमुख श्री. सुदेश चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी वसई विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे कौतुक करत पुढील काळात अधिक भक्कम विकासासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला.
[
#EknathShinde #DeputyChiefMinister #VasaiAssembly
#DevelopmentReport #OneYearAchievement #Shivsena #BJP
#MaharashtraPolitics #VasaiVirar #PublicService #MLA #SnehaDubePandit #Vasai
#एकनाथशिंदेसाहेब #उपमुख्यमंत्री
#वसईविधानसभा #विकासअहवाल
#एकवर्षपूर्ती
#महाराष्ट्रराजकारण #वसईविरार
#जनसेवा]