गोव्यात वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असून आता सर्वांचे लक्ष मान्सूनपूर्व पावसाकडे लागले आहे. सध्या अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी 20 मेनंतर मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याचा अंदाज असून 26 मे रोजी केरळमध्ये, तर 31 मेपर्यंत गोव्यात मान्सून पोहोचू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत पावसाच्या सरींना वेग येण्याची शक्यता आहे.
.
.
.
#GoaWeather #Monsoon2026 #RainAlert #WeatherUpdate #PreMonsoonRains