आज “School Mathematics in Daily Life” या उपयुक्त पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलो. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधता आला. श्री. ई. ए. पाटील सर, लेखक श्री. राजेंद्र रोकडे सर तसेच डी वाय. पाटील इंजि,कॉलेज येथील डॉ. दसरे, मुंबई येथील गणित विभागाचे विभाग प्रमुख डॉ. देसले यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
गणित हा विषय केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित नसून तो आपल्या दैनंदिन जीवनाशी अतिशय जवळून जोडलेला आहे. विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटू नये, तर त्यातील तर्कशक्ती आणि उपयोगिता समजून घेण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी अशा प्रकारची पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतात. या उपक्रमाबद्दल पुस्तकाचे लेखक श्री. राजेंद्र रोकडे सर आणि या कार्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन केले.
या प्रसंगी श्री. भुजबळ सी. ए, श्री. नरेंद्र म्हात्रे सर, श्री. प्रताप महाडिक सर, श्री. रविंद्र पाटील सर, श्री. दत्ता घोडगे सर तसेच श्रीम. सुमती सुपया, राजेशी यादव, श्रीम. सीमा म्हात्रे, श्रीमती संगीता रोकडे त्याचबरोबर सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.
#BookLaunch #SchoolMathematicsInDailyLife #EducationMatters #MathematicsEducation #LearningBeyondBooks #StudentInspiration #KnowledgeSharing #EducationalInitiative #AcademicEvent #InspiringEducation