🗓️ २९ एप्रिल २०२६ | 📍मंत्रालय
अमराठी चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्यासाठी परिवहन विभागाचा पुढाकार
राज्यातील प्रवासी सेवा अधिक सुसंवादी व प्रभावी करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने अमराठी चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या संक्षिप्त मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
ही पुस्तिका विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच Ola आणि Uber सारख्या प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सोप्या व आवश्यक मराठी वाक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला असून, प्रवाशांशी सुसंवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये आणि सेवा अधिक सुलभ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्रात सेवा देताना स्थानिक भाषेचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘व्यवहारिक मराठी’च्या माध्यमातून चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन सेवेत गुणात्मक सुधारणा घडेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मा. ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी केले.
परिवहन विभागाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, पुढील काळात राज्यभर अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
#PratapSarnaik #TransportMinistet #PublicService #LocalLanguage #MarathiPride