URJA Incubation Program अंतर्गत महाराष्ट्रा मधील ३४ जिल्ह्यातील जिल्हा व्ययस्थापक (Livelihood आणि Marketing) यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय ओरिएंटेशन सत्र दि. ११ व १२ जून २०२६ रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या (RMP) प्रांगणात यशस्वीरित्या पार पडले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. निलेश सागर (मुख्य कार्यकारी अधिकारी, MSRLM), श्री. अभिराम घड्याळपाटील (कार्यकारी संचालक, RMP), डॉ. प्रकाश आवाडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, RMP) आणि श्री. उदय वांकावाला (मुख्य कार्यकारी अधिकारी, अटल इंक्युबेशन सेंटर [AIC-RMP]) यांची उपस्थिती लाभली. पहिल्या दिवशी श्री. सूरज आव्हाड (कार्यक्रम विभाग प्रमुख, RMP) यांनी सर्व सहभागींचे स्वागत केले . तसेच श्री. राजीव सिंघल (राष्ट्रीय व्यवस्थापक, NRLM) यांचेही मार्गदर्शन लाभले.
श्री. संदीप जठार (उपसंचालक, MSRLM), राज्य मिशन व्यवस्थापक आणि फार्म, नॉन-फार्म, उपजीविका, कन्वर्जन्स, UMED Mart आदी विविध राज्यस्तरीय विभागांचे प्रतिनिधी, तसेच AIC-RMP चे Mentors आणि Startups चा सक्रिय सहभाग लाभला.
@Dev_Fadnavis
@Jaykumar_Gore
@Vinay1011
@abhiramgpatil
#MSRLM #UMED #LivelihoodDevelopment #MarketingLeadership
#RuralEntrepreneurship #CapacityBuilding #OrientationProgram
#MaharashtraDevelopmentModel #AtmanirbharBharat #उमेदअभियान #आत्मनिर्भरभारत