मेट्रो लाईन ९ व ७ ए ला आरोग्य, सुरक्षा व पर्यावरण क्षेत्रातील राष्ट्रीय सन्मान प्राप्त !
मुंबईसाठी अभिमानाचा क्षण!
मेट्रो लाईन ९ (दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर) आणि मेट्रो लाईन ७ ए (गुंदवली ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ) या प्रकल्पांना आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण (HSE) क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठित IIN-प्लॅटिनम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या इन्फ्राकॉन इंडिया नॅशनल अवॉर्ड्स २०२५ (IINA) या कार्यक्रमात राष्ट्रीय दर्जाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही गौरवशाली उपलब्धी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भाप्रसे) यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली मिळाली आहे.
हा पुरस्कार IINAच्या परीक्षकांनी दोन्ही मेट्रो मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून खालील निकषांवर आधारित दिला आहे:
१. कामगार व प्रवासी यांच्या सुरक्षिततेसाठी राबवलेली प्रभावी आरोग्य व सुरक्षा उपाययोजना
२. बांधकाम प्रक्रियेतील पर्यावरणीय नियमांचे व सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन
३. शहरी पायाभूत प्रकल्पांमध्ये नव्याने राबवलेली अभिनव सुरक्षा उपाययोजना
ही मान्यता एमएमआरडीएच्या बांधकाम क्षेत्रातील पर्यावरणपूरक दृष्टीकोन, सुरक्षित कामकाजाचे वातावरण आणि सहभागी प्रत्येक घटकाच्या—कामगारांपासून ते भावी प्रवाशांपर्यंत—कल्याणासाठी असलेल्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
हा पुरस्कार केवळ एक गौरव नसून, मुंबईसाठी एक सक्षम, टिकाऊ आणि जागतिक दर्जाचे मेट्रो नेटवर्क उभारण्याच्या एमएमआरडीएच्या व्यापक ध्येयाचा गौरव आहे.
या राष्ट्रीय सन्मानाबद्दल आम्ही IIN आणि इन्फ्राकॉन अवॉर्ड्स समितीचे मन:पूर्वक आभार मानतो आणि भविष्यातही जलद, सुरक्षित, हरित आणि सर्वसमावेशक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत.
MMRDA’s Metro Lines 9 & 7A Win National Recognition for Health, Safety & Environmental Excellence
In a proud moment for Mumbai, Under the visionary leadership of Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, Authority (MMRDA) has been honoured with the prestigious IIN-Platinum Award in the category of Best Practices in Health, Safety & Environment (HSE) at the Infracon India National Awards (IINA) 2025, held in New Delhi.
This award was presented for the outstanding standards maintained on Mumbai Metro Line 9 (Dahisar East to Mira Bhayandar) and Metro Line 7A (Gundavali to CSIA Airport).
The award follows a detailed site assessment conducted by the IINA jury, which evaluated the following key areas:
1.Strong health and safety measures followed on-site to ensure worker and commuter safety.
2.Strict compliance with environmental norms and safety protocols throughout the construction process.
3.Innovative safety practices introduced to set new industry benchmarks in urban infrastructure projects.
This recognition is a testament to MMRDA’s unwavering commitment to creating a safe and secure working environment, protecting the ecology around construction zones, and prioritising the well-being of all involved—from construction workers to future commuters.
It also reflects our broader mission to develop a world-class, sustainable, and efficient metro network for the people of Mumbai.
We sincerely thank IIN and the Infracon Awards jury for this national honour and pledge to continue delivering infrastructure that is not only fast and efficient, but also safe, green, and inclusive.
#MetroLine9 #MetroLine7A #IINAwards2025 #HSEExcellence #SafeInfrastructure #GreenConstruction #UrbanMobility #SustainableDevelopment #AwardWinningMetro #InfrastructureLeadership #SmartCityMumbai #NationalRecognition #MMRDA50 #Development #RebootingMumbai #ReshapingMMR #MumbaiMetroRegion #TransformingMumbai #MumbaiInMinutes
@DrSanMukherjee