📍धसपाडा, अर्नाळा, वसई
🗓️ दिनांक ३१ मे २०२५
माझ्या वसई विधानसभा क्षेत्रातील धसपाडा, अर्नाळा येथे काल अत्यंत दुर्दैवी घटना घडली. महावितरण कंपनीचे कर्मचारी स्व. जयश घरत हे विद्युत रोहित्राचे दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विजेचा तीव्र झटका बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हा अपघात केवळ एक कर्मचारी गमावण्याचा नाही, तर आपल्या समाजातील एक कर्तव्यदक्ष, मेहनती आणि प्रामाणिक व्यक्ती गमावल्याचा आहे.
या दुःखद घटनेची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी जाऊन घरत कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या दुःखात मी मनापासून सहभागी झाली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना केली.
याच दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. नितीन साळवी आणि विद्युत सहाय्यक श्री. पवन कुमार इंगळे यांची रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली.
या भेटीदरम्यान माझ्या सोबत नालासोपारा (प.) सब डिव्हिजनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. आलोक कारंडे, फ्लाईंग कोड वसईचे वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. सचिन निगुडकर, तसेच अन्य महावितरण अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
ही घटना अत्यंत गंभीर असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
#TributeToJayeshGharat #MSEDCL #ElectricalAccident #VasaiNews #PublicRepresentative #Condolences #ElectricalSafety #VasaiAssembly #FieldVisit #SupportToFamily #StaySafeAtWork #InServiceOfPeople