चिखलीत पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी व नागरिकांना दिलासा:🌧️
गेल्या चोवीस तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिखली शहराजवळून जाणाऱ्या जामवंती नदीला पूर आला असून जुना बुलढाणा रोड बंद झाला आहे. राऊतवाडी, खलसे प्लाॅट, सैलानी नगर येथे पाणीच पाणी झाले आहे.
माळीपुरा व खडकपुरा भागात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने शहरातील माळी भवन येथे नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. गजानन नगर येथील वायझडी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी शेतात घुसून नुकसान झाले आहे.
शहरातील या पूरपरिस्थितीची पाहणी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पंडितदादा देशमुख ज्येष्ठ नेते, सुहास शेटे माजी नगराध्यक्ष, सागर पुरोहित शहराध्यक्ष भाजप, प्रा. वीरेंद्र वानखेडे, दीपक खरात, विलास घोलप शिवसेना शहर प्रमुख, सुदर्शन खरात, तुषार भावसार, शेख अनिस भाई, युवराज भुसारी, सचिन कुलवंत, सुभाष खरात, सुरेश इंगळे पाटील, स्वीयसहाय्यक , दत्ता खंडेलवाल, विजय वाळेकर शहराध्यक्ष युवा मोर्चा, विष्णू मेथे, दत्ता सुसर, सिद्धेश्वर ठेंग या पदाधिकाऱ्यांनी केली व नागरिकांना दिलासा दिला.🤝
#Chikhli #Buldhana #FloodRelief #HelpForNeedy #DisasterRelief #ReliefWork #UnitedForPeople #HumanityFirst #TogetherWeCan #ServingSociety #HelpingHands #BJPKaryakarta #ShwetaMahalePatil #BJPChikhali