आज प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांनुसार छत्रपती संभाजी नगर विधानसभा (पश्चिम) येथे आयोजित संघटनात्मक बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला व आगामी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
सदर बैठकीत मा. श्री किशोर शितोळे (जिल्हा अध्यक्ष), श्री. किरण पाटील (प्रदेश सचिव), श्री. जालिंदर शेंडगे (समाज कल्याण समिती - सभापती), श्रीमती शोभाताई बुरांडे(महिला व बाल कल्याण समिती - सभापती), श्री. हर्षवर्धन कराड (जिल्हा सरचिटणीस) यांसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी संघटन अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या विचारांना अधिक व्यापक करण्यासाठी व तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा बैठका अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
#BJP #Karyakarta #SunilRane #GrassrootConnect #NationFirst