अनेकदा टाळलं पण काही गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर बोलणं सोपं आहे.. १० कामांची यादी देतोय
१. अर्थात मेट्रो
२. सिंहगड रस्त्यावरील, कर्वे रस्त्यावरील, घोरपडी पेठेतील कोंडी फोडण्यासाठी flyover
३. जवळजवळ शून्य लोड शेडींग
४. पुणे विमानतळाचे extension (मी प्रवास करतो मला माहिती आहे याचा किती उपयोग झालेला आहे ते)
५. पुणे मुंबई महामार्गावरील कायमची कोंडी तोडली चांदणी चौकात
६. पुण्यात अनेक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झालेले आहे, आणखीनही होत आहे.. एक तर आपल्याच भागात आहे
७. Amongst top 5 FDI destinations in India. कित्येकांची कुटुंबे यावर जगत आहेत
८. वारकरींच्या साठी संपूर्ण पथावर उत्तम व्यवस्था केली. (वारीमुळे प्रदूषण आणि कचरा वाढतो म्हणत घरी बसणाऱ्यांसाठी फायदा होणार नाही पण वारकऱ्यांसाठी निश्चित फायदा झालेला आहे)
९. PMPLM च्या ताफ्यात अनेक इ बसेस आलेल्या आहेत. (अर्थात जे वापरतात त्यांनाच फायदा माहिती आहे), अजून येणार आहेत.
१०. रिंगरोड चे काम सुरु आहे.
आता थोडीशी माहिती असावी म्हणून,
पोटनिवडणुकीत भाजपला नाकारून ज्या माणसाला आमदार व्हायला नकारात्मक लोकांनी भाजप ला मतदान न करून अप्रत्यक्षपणे मदत केली त्याने काय दिवे लावले आहेत म्हणून याही वेळेस पुन्हा त्यालाच जिंकायला मदत करणार आहोत? सध्याच्या कसब्याच्या आमदाराने केलेली किमान ३ विधायक कामे सांगा.. किमान ३! मी भाजपची १० सांगितली
आणखीन एक गोष्ट, आमदाराची कर्तव्ये आणि नगरसेवकाची (महानगरपालिकेची) कर्तव्ये यातला फरक कितपत माहिती आहे? की बाबूंनी वाट लावलेल्या महानगरपालिकेच्या नाकर्तेपणाचे खापर देखील निवडून न दिलेल्या भाजपच्या उमेदवाराच्या खात्यावर ढकलायचं आहे?
याचा अर्थ सगळं काही आलबेल आहे का? नाही! पण कुठल्या तरी आदर्श राज्याची (Utopia) स्वप्नं बघत असाल तर इथेच काय, युरोपमध्ये जाऊन सुद्धा पदरी निराशाच येईल. प्रश्न फक्त इतकाच आहे, सर्व options मध्ये पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि त्याहून पुढे देशासाठी योग्य आहे? माझ्या मते भाजप हाच उत्तम पर्याय आहे.
अवश्य विचार करा आणि .. असो आधी विचार तरी करा! मग चर्चा करू.
२०१४ मध्ये काँग्रेस ला शिव्या देत भाजप सत्तेत आले.२०१४ ते २०२४ भाजप ने पुण्यात मेट्रो व्यतिरिक्त लोकांच्या आयुष्यात फरक पडेल अशी १० विधायक काम केलेली दाखवावित. उगाच काँग्रेस सारखं हे करीन ते करीन सांगत बसू नका.
सगळे राजकीय पक्ष एका माळेतले मणी.