आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथे कसबा तारळे जिल्हा परिषद उमेदवार मा. राजश्री पाटील, कसबा तारळे पंचायत समिती उमेदवार मा. दीपक पाटील व कौलव गणाच्या उमेदवार मा. शितल बळवंत बरगे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडली.
या सभेदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना, आमचे उमेदवार हे सर्वसामान्य कुटूबांतील असून त्यांना सामान्य माणसाच्या समस्यांची जाण आहे. मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन हेच माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मतदारांनी आमच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. असे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, भोगावतीचे माजी संचालक मा. एकनाथ पाटील (कंथेवाडीकर), तसेच मा. एकनाथ चौगले, मा. शांताराम बुगडे, मा. दतात्रय हणमा पाटील, मा. रावसाहेब डोंगळे, मा. मोहन पाटील, मा. धोंडीराम पाटील, मा. दतात्रय रणदिवे, मा. धोंडीराम पाटील, मा. बाबुराव पाटील, मा. मानसिंग पोवार, मा. बाबुराव व्हरकट आदी मान्यवरांसह या परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🗓️ २ फेब्रुवारी २०२६ | 📍शिरगाव, कोल्हापूर
#Shivsena #prakashabitkar #ElectionCampaign #UnityForGrowth #visionforprogress