आज ठाणे येथील महावीर स्क्वेअर,टिकुजीनी वाडी रोड परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या विविध स्थानिक समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तातडीने उपाययोजना करण्याबाबत उपस्थितांशी चर्चा केली.
या भेटीदरम्यान सोसायटीमधील पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी, गॅस पाईपलाईनच्या कामाची पाहणी तसेच परिसरातील विहीर स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नांवर प्रभावी आणि शाश्वत तोडगा काढण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करण्याबाबत आश्वासित केले.
लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाऊन समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करणे, हेच आपल्या जनसेवेचे ध्येय आहे. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी नगरसेविका सौ. स्नेहा आंब्रे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष श्री. रमेश आंब्रे, भाजप पदाधिकारी व सन्माननीय नागरिक उपस्थित होते.
📍 ठाणे
🗓️ १४ जून २०२६
#JanSamvad #LocalIssues #ThaneDevelopment #NirantarDhyas #niranjandavkhare