उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनातून, माझ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आणि उपलब्ध करून दिलेल्या विशेष निधीतून ठाणे शहरातील सर्वात जुनं असलेलं तलावपाळी येथील महिला उद्यान नव्याने बांधण्यात आलं आहे. नुकतंच या सुंदर, सुशोभित आणि आधुनिक स्वरूपात उभ्या राहिलेल्या उद्यानाचं लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलं
हे महिला उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत भग्न आणि दुर्लक्षित अवस्थेत होतं. एकेकाळी महिलांसाठी सुरक्षित, आनंददायी आणि विरंगुळ्याचं ठिकाण असलेलं हे उद्यान काळाच्या ओघात मोडकळीस आलं होतं. महिलांना पुन्हा एकदा सुरक्षित आणि सुसज्ज ठिकाण मिळावं, या उद्देशाने माझ्या संकल्पनेतून या उद्यानाच्या संपूर्ण सुशोभीकरण व नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला.
आता हे उद्यान पूर्णपणे नव्या रूपात उभं राहिलं आहे. स्वच्छ आणि आकर्षक पायवाटा, भरपूर हिरवळ, आरामदायी बसण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. महिलांच्या गरजा लक्षात घेऊन याठिकाणी खास फीडिंग रूमची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याचबरोबर आउटडोअर फिटनेससाठी आधुनिक व्यायाम उपकरणेही बसवण्यात आली आहेत. महिलांसाठी आरक्षित असलेलं हे उद्यान योग्य आणि सकारात्मक उपयोगासाठीच वापरलं जावं आणि याची योग्य काळजी घेतली जावी, याबाबत प्रशासनालाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
हे महिला उद्यान सुरू झाल्याबद्दल या परिसरातील महिलांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं. याबद्दल नागरिकांच्या वतीने मुकुंदराज देव आणि श्री. जोशी यांनी माझे आणि शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानले.
यावेळी माझ्यासह स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, मृणाल पेंडसे प्रतिभा मढवी, सुधीर कोकाटे, शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार, विभागप्रमुख पवन कदम, ठाणे शहर समन्वय प्रकाश पायरे, शिवसेना विभागप्रमुख किरण नाकती, प्रीतम राजपूत तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते. आणि उपयोगाचे जोशी यांनी खासदार म्हणून माझे मनापासून आभार मानले.
#nareshmhaske #TalavPali #ThaneCity #MahilaUdyan #WomenFirst #SafeSpaceForWomen #UrbanBeautification #GreenThane #GardenDevelopment #PublicInfrastructure #CitizenCentric #MPFund #SpecialFund #EknathShinde #Shivsena #ThaneDevelopment #WomenEmpowerment #OutdoorFitness #CleanAndGreen #CommunityWelfare #PositiveChange