१२ ऑगस्ट २०२५ | 📍 सह्याद्री अतिथीगृह
आज माझ्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत छोट्या नर्सिंग होम्सच्या समस्यांबाबत मा. मंत्री श्री.
@NiteshNRane जी यांच्या उपस्थितीत इंडीयन मेडीकल असोशिएशन आणि अस्तित्व परिषदेसमवेत महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या छोट्या नर्सिंग होम्सना नवीन येणाऱ्या सुधारणात पूर्वलक्षी प्रभावाने घेऊ नये, नोंदणी नूतनीकरण ३ वर्षांऐवजी ५ वर्षांनी व्हावे तसेच नोंदणी नुतनीकरण शुल्कात एकसमानता राखण्याबाबत आणि नर्सिंग होम नोंदणी करताना आवश्यक स्टाफिंग पॅटर्नमध्ये सवलत देण्याबाबत चर्चा झाली.
याशिवाय या ॲक्ट अंतर्गत महत्त्वाच्या बाबींमध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र अग्निशमन दल, आपत्कालीन सेवा, नगर विकास विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर संबंधित विभागांच्या समवेत संयुक्त बैठक आयोजित करणेबाबत विभागास निर्देश देण्यात आले.
खासगी रुग्णालयांमध्ये सुविधा, तपासणी शुल्क, उपचाराचे दर याबाबतची माहिती दर्शनी भागात स्पष्टपणे प्रदर्शित करण्याबाबत तसेच कुष्ठरोग, क्षयरोग आणि असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांच्या प्रतिबंधात्मक व प्रचारात्मक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणेबाबत इंडीयन मेडीकल असोशिएशनकडून राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांना कळवावे अशा सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस, डॉ. निपुण विनायक (सचिव-१, सार्वजनिक आरोग्य विभाग), डॉ. कादंबरी बलकवडे (आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई) , डॉ. नितीन अंबाडेकर (संचालक, आरोग्य सेवा,मुंबई), डॉ. सुनिता गोल्हाईत,(सहसंचालक, रुग्णालये,आरोग्य सेवा), श्री. मिलिंद कुलकर्णी (फाऊंडर, अस्तित्व परिषद), डॉ. अनिल आव्हाड (सचिव, आय.एम.ए.) तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #Prakashabitkar #BombayNursingHomeAct #SmallNursingHomes #HospitalReforms #HealthCareServices #MaharashtraHealthDepartment