📍 सह्याद्री अतिथीगृह, मुंबई | सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा संदर्भातील आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी उपस्थित होतो. या बैठकीत कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, रस्ते, मलनिस्सारण व वाहतूक व्यवस्थापन याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
सिंहस्थ कुंभमेळा हा श्रद्धा, संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. यावेळी नाशिकमध्ये होणाऱ्या या ऐतिहासिक उत्सवासाठी गोदावरी नदीपात्रातील पाणी स्वच्छ ठेवणे, रस्त्यांची व मलनिस्सारणाची कामे पूर्ण करणे ही प्राथमिकता आहे. तसेच साधूग्राम/टेंटसिटीसाठी भूसंपादन व सुविधा निर्माण करण्यास गती देण्यात यावी, अशा सूचना बैठकीदरम्यान केल्या.
कुंभमेळ्यासाठीच्या सर्व कामांमध्ये गुणवत्ता आणि वेग दोन्ही ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पोलिस निवास, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूक व सार्वजनिक सेवा तसेच नागरिकांची सुरक्षितता याकडे विशेष लक्ष दिले जाईल. ‘डिजिटल कुंभ’ संकल्पनेद्वारे प्रचार-प्रसिद्धी व्यवस्थित केली जाईल आणि कोणत्याही नकारात्मक माहितीला त्वरित स्पष्टीकरण दिले जाईल. सर्व विभागांनी या कामांसाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करावा, कामे वेळेत पूर्ण करावी, आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याकडे काटेकोर लक्ष दिले जाईल, असा यावेळी एकमताने निर्धार करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पणनमंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेशकुमार,पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला,नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा,आयुक्त मनीषा खत्री, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.
#SimhasthaKumbhMela #Nashik2027 #InfrastructureReview #CulturalHeritage