दिव्यांगजन सशक्तीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारच्या “सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन पुरस्कार २०२५” ने सन्मानित झालेल्या अबोली जरित यांचा आज मा. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नागपूर येथील अबोली जरित यांनी शारीरिक अडचणींवर मात करत गायन, मॉडेलिंग आणि सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून देशभरातील दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला आहे. त्यांच्या जिद्द, आत्मविश्वास आणि संघर्षमय प्रवासाने अनेकांना नवी दिशा दिली आहे.
सत्कारानंतर अबोली यांनी गायन करून दाखविले तसेच त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या.
यावेळी मा. सत्तारूढ पक्षनेते प्रशांतजी शितोळे, मा. स्थायी समिती सभापती अभिषेकभाऊ बारणे, मा. विरोधी पक्षनेते भाऊसाहेबजी भोईर, मा. नगरसदस्य प्रविणजी भालेकर, यशभाऊ साने उपस्थित होते.
#AboliJarit #DivyangjanSashaktikaran #Inspiration #PCMC #MayorOffice
(जिद्द, संघर्ष, आत्मविश्वास, प्रेरणा, नारीशक्ती, समावेशक समाज, दिव्यांग सक्षमीकरण, कर्तृत्व, यशोगाथा, सकारात्मकता, प्रेरणादायी प्रवास, सामाजिक बांधिलकी, सन्मान, गौरव, प्रेरणेचा दीप)